26.7 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeउद्योगतामिळनाडूच्या साखर उद्योगाला संजीवनी

तामिळनाडूच्या साखर उद्योगाला संजीवनी

इंदापूर : प्रतिनिधी
तामिळनाडूतील साखर उद्योगाच्या विकासासाठी मोठे पाऊल उचलले जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची चेन्नई येथे भेट झाली. या बैठकीत राज्यातील साखर उतारा वाढवणे आणि एफआरपी संदर्भातील अडचणी दूर करण्यावर विशेष चर्चा झाली.

यादरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी तामिळनाडूचे सहकार मंत्री के. आर. पेरियागरुप्पन यांच्यासोबत राज्यातील साखर उद्योगाच्या अडचणी आणि विकासाच्या संधी यावर विस्तृत चर्चा केली. तसेच, इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी राष्ट्रीय सहकार विकास निगम मार्फत कर्जपुरवठ्याबाबतही चर्चा झाली.

सध्या तामिळनाडूमध्ये एकूण १८ सहकारी साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यांच्या साखर उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि एफआरपी संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हर्षवर्धन पाटील राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

या भेटीमुळे तामिळनाडूतील साखर उद्योगाला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येत्या काळात राज्य सरकार आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तामिळनाडूतील साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR