35.5 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeक्रीडादिल्लीचा चेन्नईला दे धक्का

दिल्लीचा चेन्नईला दे धक्का

विशाखापट्टणम : महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला. धोनीने १६ चेंडूंत ३७ धावांची खेळी साकारली. धोनीने यावेळी सर्वांची मने जिंकली. पण त्याला चेन्नईला हा सामना जिंकवता आला नाही. डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १९१ धावा उभारल्या. दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची २ बाद ७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर अजिंक्य रहाणेने ४५ धावांची खेळी साकारत संघाला सावरले. पण तो बाद झाला आणि चेन्नईचा संघ अडचणीत आला. धोनीने संघाला जिंकवण्याचा प्रयत्न केला खरा, पण चेन्नईला २० धावांनी पराभव पत्करावा लागला.

दिल्लीच्या १९२ धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले. त्यामुळे त्यांची २ बाद ७ अशी अवस्था झाली होती. पण त्यावेळी अजिंक्य रहाणे संघाच्या मदतीला धावून आला. त्याने डॅरिल मिचेलला आपल्या साथीला घेतले आणि दिल्लीच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. या दोघांनी तिस-या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली, मिचेल ३४ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर अजिंक्यच्या साथीला आला तो शिवम दुबे आला. या जोडीने डाव सावरला. त्यानंतर अजिंक्य रहाणे ४५ धावांवर बाद झाला आणि चेन्नईला मोठा धक्का बसला. त्यानंतरच्या चेंडूवरच समीर रिझवी बाद झाला. त्यानंतर धोनी आणि जडेजाने डाव सावरला. परंतु धोनीला विजय मिळवून देता आला नाही. तथापि त्याच्या खेळीने सर्वांची मने जिंकली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR