26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र सदन घोटाळ््याची सोमवारी सुप्रीम सुनावणी

महाराष्ट्र सदन घोटाळ््याची सोमवारी सुप्रीम सुनावणी

छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढणार?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून उद्या सुनावणी होणार आहे. यामुळे छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

याबाबत अंजली दमानिया यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ््यात छगन भुजबळांना निर्दोष सोडण्यात आले होते. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दीड वर्ष ऐकले जात नव्हते. पाच न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर एक एसएलपी करून माननीय सरन्यायाधीशांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले आहेत. शेवटी प्रकरण उद्या अनुक्रमांक १२ वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांची याआधी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनीही दोषमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती.

भुजबळांविरोधात
दमानिया यांची याचिका
भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका केली होती. आता या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. छगन भुजबळांना मिळालेली क्लीनचिट कायम राहणार की न्यायालय पुन्हा शिका सुनावणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR