25.9 C
Latur
Wednesday, June 25, 2025
Homeलातूरदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चित्रपटाची संधी कौतुकास्पद

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चित्रपटाची संधी कौतुकास्पद

लातूर : प्रतिनिधी
समाजासाठी जगणारी माणसे कमी असतात. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते. सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत आहात. समावेशाच्या दिशेने हृदयस्पर्शी पाऊल चित्रपटाच्या माध्यमातून समज आणि आनंदाला प्रोत्साहन देणारा चित्रपट आपण या चित्रपटाची निवड केली व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली हे कौतुकास्पद आहे, असे मत विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले.
इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व उमंग सेंटर लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वमग्न मुलांसाठी चारिटी शोचे आयोजन लातूर येथील पी व्हि आर सिनेमागृहात करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अभय कदम, सचिव ऋषिकेश हरिदास, आयएमए महिला विंग अध्यक्षा डॉ. ज्योती सुळ, सचिव प्रियंका डावळे, जिल्हा बँकेचे व्हॉइस चेअरमन अँड. प्रमोद जाधव, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, उमंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. प्रशांत उटगे, पिंक हेल्थ च्या अध्यक्षा डॉ. वैशाली दाताळ, डॉ. विश्रांत भारती, डॉ. राजकुमार दाताळ, डॉ. राहुल सूळ, डॉ. हमीद चौधरी ,डॉ. वर्धमान उदगीरकर, डॉ. पद्मसिंह बिराजदार, डॉ. महादेव बनसोडे, डॉ. माधुरी कदम, डॉ. सारिका देशमुख, डॉ. मुकुंद भिसे, डॉ सचिन इंगळे उपस्थित होते.
आय एम ए महिला विंग च्या वतीने दरवर्षी चित्रपटाचे आयोजन करण्यात येते. त्याच संकल्पनेतून सितारे जमीन पर या चित्रपटाची निवड करण्यात आली. त्याचबरोबर स्वमग्न मुलांसाठी हा चित्रपट असल्याने लातूर येथील दिव्यांग मुलांना चित्रपट पाहण्यासाठी स्पॉन्सरशिप म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी पीव्हीआर चित्रपट ग्रह उपलब्ध करून दिला. याचबरोबर फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलच्या वतीने रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली होती. यावेळी बहुविकलांग मुलांसह त्यांचे पालक, डॉक्टर्स, उमंग सेंटर येथील कर्मचारी, लातूर जिल्हा बँकेचे सहकारी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR