21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeमहाराष्ट्रदु:ख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे... ; खासदार कंगना राणावत भावूक

दु:ख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे… ; खासदार कंगना राणावत भावूक

मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार यांच्या निधनाची माहिती समजताच भाजप खासदार कंगना राणावत यांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केले आहे. अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. ही दु:खद घटना आज (२८ जानेवारी २०२६) सकाळी घडली.

बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजितदादांनी अखेरचा श्वास घेतला. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन सृष्टीतून कलाकार दु:ख व्यक्त करत आहेत. बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतून कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करून दु:ख व्यक्त करत आहेत. अजितदादांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आता यावर भाजप खासदार कंगना राणावत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्याचा व्हीडीओ समोर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR