लातूर : एजाज शेख
दुष्काळात शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य माणूस अक्षरश: होरपळून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य माणूस यांच्याकडे कर्जवसुलीसाठी मानसिक त्रास देणे, अपमानास्पद वर्तन करणे, धमकावणे, हिंसाचार करणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा वापर करणे, अशा बेकायदेशीर किंवा नियमबा कृतीचा अवलंब करू नये, असे सरकारकडून स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स व इतर खासगी वित्तीय संस्थांना ठणकावून सांगण्या आले आहे. सरकारच्या या आदेशानंतर स्मॉल फायनान्स, मायक्रो फायनान्सचालक अधिक क्रियाशील झाले असून चक्क वकीलमार्फत शेतकरी, शेतमजूरांना फोन केला जात आहे. फायनान्सचालकांचा हा नवा फंडा शेतक-यांना त्रासदायक ठरत आहे.
राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळण्यास होणारा विलंब यांमुळे शेतकरी नाइलाजाने सावकारांकडे वळतात. कायद्यानुसार तारण कर्जासाठी वार्षिक १२ टक्के आणि विनातारण कर्जासाठी १५ टक्के व्याजदर ठरवून दिलेला आहे. मात्र, बेकायदेशीर सावकार महिन्याला ३ टक्के ते १२ टक्के (वार्षिक ४० टक्के ते १०० टक्के पेक्षा जास्त) या दराने व्याज वसूल करतात. लातूर जिल्ह्यातील शेती क्षेत्रातील संकटे मोठी आहेत. नैसर्गिक आपत्ती (दुष्काळ, अवेळी पाऊस), पिकांचे नुकसान आणि शेतीमालाला योग्य हमीभाव न मिळणे यांमुळे शेतकरी घेतलेले कर्ज वेळेत फेडू शकत नाहीत. महाराष्ट्रात अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४’ लागू करण्यात आला आहे. या परवान्याशिवाय सावकारी करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे.
















