देगलूरमध्ये दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाड;१९ आरोपी ताब्यात; १ लाख ५९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : प्रतिनिधी
देगलूर पोलिसांनी २ वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर तिर्रट जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण १९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ५९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १९ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

देगलूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खानापूर येथील सार्वजनिक ठिकाणी काही जण तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे समोर आले. पोलिसांनी कारवाई करत गजानन बाबुराव हेंटे , पांडुरंग लक्ष्मणराव डुडलवार , व्यंकट मानाजी हानटे , विठ्ठल लक्ष्मण डुडलवार , अनिल विठ्ठल गायकवाड, सदामैनोदीन पाशा, गजानन खुशोबा, विरभद्र काशीनाथ शिवाचार्य आणि शंकर हाणमंत लाळे ( सर्व रा. खानापूर, ता. देगलूर) यांच्याविरुद्ध कारवाई केली.या कारवाईत ३ मोबाईल (२० हजार रुपये), रोख २ हजार ६१० रुपये, १ दुचाकी ( ४० हजार रुपये) व जुगाराचे साहित्य, असा एकूण ६२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यातआला.याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी कारवाई शिवबानगर, देगलूर येथील मोकळ्या जागेत करण्यात आली. येथेही तिर्रट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत लक्ष्मण लालू बोगुलवार ( रा. दत्तनगर), सुरेश मारोती गवलवाड (रा. जयभीमनगर), स्वराज राजुकांबळे ( रा. भायेगाव रोड), राम भुमन्ना म्याकलवार ( रा. आनंदनगर), विजय पंढरी दौडे ( रा. सुभाषनगर), बजरंग माधव यरगलवार ( रा. गोकुळनगर), दिलीप गंगाधर गुगेवार ( रा. बंडागल्ली), अर्जुन शिवाजी चव्हाण ( रा. कलामंदिर तांडा), सुनील विठ्ठलराव सावित्रावार (रा.तुकारामनगर) आणि पिराजी म्हैसाजी पुठेवाड ( रा. शिवबानगर,देगलूर) यांचा समावेश आहे.

या कारवाईत ९ मोबाईल ( ७६ हजार ३०० रुपये), रोख २० हजार ३६० रुपये आणि जुगाराचे साहित्य, असा एकूण ९६ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनमंत शिंदे, किरण बेंबडे, तसेच पोलीस अंमलदार केंद्रे, घुमे, मधुकर नामपल्ले आणि विशाल अटकोरे यांनी ही कारवाई केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Arvind Patil Nilangekar|३३.५३ कोटींचं कर्ज प्रकरण; निलंगेकरांची याचिका खंडपीठाकडून फेटाळली
02:43
Video thumbnail
Latur Illegal Moneylending Case | अवैध सावकारीविरोधात गुन्हा दाखल | Latur News | Ekmat Digital
01:52
Video thumbnail
Latur Railway Coach Factory | स्थानिक युवकांना रोजगार कधी? | Latur News | Ekmat Digital
03:12
Video thumbnail
माहूरजवळ भीषण अपघात | एकाचा मृत्यू, चार गंभीर जखमी | Nanded News Today
02:03
Video thumbnail
Latur|समान वेतनासाठी सेवानिवृत्त कर्मचारी आक्रम;कवेतनातील तफावत कधी मिटणार?
06:30
Video thumbnail
Nanded Sand Mafia Action | आठ बोटी ब्लास्ट करून नष्ट | LCB Raid | Nanded News
00:48
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये १४.४८ लाखांचा गुटखा जप्त | बोलेरोसह मुद्देमाल ताब्यात | Latur News
01:42
Video thumbnail
'गोविंदा' अन् 'उदो उदो'च्या जयघोषात अंबाबाईला तिरुपती देवस्थानचा मानाचा शालू अर्पण
00:56
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
47:58
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37

Latest news