24.3 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeक्रीडाधावांचा डोंगर, केकेआर विजयी

धावांचा डोंगर, केकेआर विजयी

विशाखापट्टणम : आयपीएलच्या १६ व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध २० षटकात २७२ धावा ठोकून आयपीएलमधील दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. केकेआरकडून सलामीवीर सुनिल नारायणने ३९ चेंडूत ८५ धावांची धडाकेबाज खेळी करत चांगली सुरुवात करून दिली तर पदार्पण करणा-या रघुवंशीने ५४ धावांची खेळी करत सर्वांना प्रभावित केले.

यावर कडी म्हणून आंद्रे रसेल आणि रिंकू सिंहने स्लॉग ओव्हरमध्ये तडाखे देत केकेआरला २५० पार पोहोचवले. रिंकूने ८ चेंडूत २६ तर रसेलने १९ चेंडूत ४१ धावा ठोकल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात इशांत शर्माने टिच्चून मारा करत केकेआरचे आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्येचा सनराईजर्स हैदाराबादचा यंदाच्या हंगामात झालेला विक्रम मोडण्याचा मनसुबा उधळून लावला. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २० षटकात ७ बाद २७२ धावांची विक्रमी खेळी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही दुस-या क्रमांकाची मोठी धावसंख्या ठरली. याच हंगामात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावांची विक्रमी धावसंख्या उभी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR