34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयभाजप मित्रांची अमेरिकेत रॅली

भाजप मित्रांची अमेरिकेत रॅली

वॉश्ािंग्टन : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रत्येक राज्यांत जोरदार प्रचार सुरू केला असून कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र आहे. त्याचेच प्रतिब्ािंब अमेरिकेतही पडले असून येथील भाजप समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिस-या टर्मला पाठिंबा व्यक्त करणा-या रॅली काढण्यास सुरुवात केली आहे.

ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ या संघटनेने अमेरिकेतील २० शहरांमध्ये रॅली काढत नरेंद्र मोदी यांना समर्थन जाहीर केले. तसेच, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यंदाच्या निवडणुकीत चारशे पेक्षा अधिक जागा मिळवून द्याव्यात, असे आवाहनही या रॅलींत सहभागी झालेल्या भाजप समर्थकांनी केले.

‘अमेरिकेतील भारतीय समुदायाला यंदाच्या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता असून मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर पाहण्याची इच्छा आहे,’ असे मत या संघटनेचे सरचिटणीस वासुदेव पटेल यांनी सांगितले. या संघटनेने वॉश्ािंग्टन, व्हर्जिनिया, मेरीलॅँड, न्यूजर्सी, अटलांटा, जॉर्जिया या राज्यांमध्ये रॅली आयोजित केल्या होत्या.

प्रत्येक ठिकाणी किमान २०० मोटारी रॅलीमध्ये सहभागी झाल्या. भाजप समर्थकांनी काढलेल्या या रॅलीमध्ये भाषणेही करण्यात आली. यावेळी मोदी सरकारने विकासासाठी केलेल्या कामांबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच, भारत-अमेरिका मैत्री दृढ करण्यासाठी मोदींनी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली गेली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR