28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रनागपुरात २.५ रिश्टर स्केलचा भूकंप

नागपुरात २.५ रिश्टर स्केलचा भूकंप

नागपूर : नागपुरात २.५ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली असून शुक्रवारी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी हा भूकंप झाला.

पाच किलोमीटर अंतराच्या खोलीपर्यंत हा हादरा बसला. किरकोळ स्वरूपाचा हा भूकंप असून या भूकंपात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिसमॉलॉजीने सांगितले.

या वर्षात महाराष्ट्रात भूकंप वाढले
महाराष्ट्रात भूकंपाच्या धक्क्यांचे प्रमाण वाढले असून जानेवारी महिन्यात पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू तालुक्यात हादरे बसले होते. तसेच हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यातही मार्च महिन्यात ४.५ रिश्टरचा भूकंप झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR