36.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात ७ मे रोजी ‘एमआयएम’ची सभा

पुण्यात ७ मे रोजी ‘एमआयएम’ची सभा

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती आणि वंचितच्या उमेदवारासह ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमचे अनीस सुंडके निवडणूक रिंगणात आहेत.
सुंडके यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची ७ मे रोजी पुण्यात सभा होणार आहे. मात्र, सभेचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही, अशी माहिती अनीस सुंडके यांनी दिली. ते एका वृत्तपत्राला मुलाखत देताना बोलत होते.

अनीस सुंडके म्हणाले, आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकांसाठी आतापासूनच आम्ही कामाला लागलो आहोत. पुणे शहरात एमआयएमचा एक आमदार आणि महापालिकेत ३० नगरसेवक निवडून आणण्याचे एमआयएमचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे.

अनीस सुंडके पुढे म्हणाले, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी विश्वासाने मला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. मुस्लिम मतांचा वापर फक्त निवडणुकीसाठी केला जातो. मुस्लिम समाजातील प्रश्न, समस्या, शिक्षण, बेरोजगारी अशा मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंत सुंडके यांनी व्यक्त केली.
काँग्रेसवर आरोप करताना अनीस सुंडके म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम कायकर्ते आणि समाजाचा वापर फक्त राजकारणासाठी केला. मुस्लिम समाजाच्या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले.

एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करताना सुंडके यांनी असेही म्हटले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मला कामाची संधी दिली. नगरसेवक, स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी या पक्षांनी मला दिली. त्यावेळी मी कायम जात-धर्माच्या पलीकडे जाऊन काम केले.

सुंडके म्हणाले, स्थायी समिती अध्यक्ष असताना पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासाठी जागा मंजूर करण्यात आली. भवानी पेठेतील रफी अहमद किडवाई शाळा बांधण्यात आली, असे सुंडके म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR