30.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

छ. संभाजीनगर : मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील अग्रणी नेते आंबेडकरवादी राजकीय-सामाजिक विचारांचे लढाऊ पँथर यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी दु:खद निधन झाले. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते होते.

पँथर रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष होते. गंगाधर गाडे महाराष्ट्राचे माजी परिवहन राज्यमंत्री होते. ते पँथर चळवळीत लोकप्रिय नेते होते. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते.

७ जुलै १९७७ रोजी दलित पँथरचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, अशी सर्वप्रथम मागणी केली होती. १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार केला गेला.

गंगाधर गाडे यांचा जन्म १९३९ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोळी गावात झाला. १९७२ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते. ते मंत्री देखील राहिले आहेत. अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR