लातूर : प्रतिनिधी
शहरात गेल्या दोन वर्षांपासून विनापरवाना नारायणा इ टेक्नो शाळा चालू होती. ही शाळा दि. २४ जून रोजी अखेर शिक्षण विभागाने सील केली आहे. मनसे ने शिक्षण विभागाला ही बाब निदर्शनास आणून देवून मनसेच्या वतीने शिक्षण विभागाला वेळोवेळी निवेदन दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळा अनधिकृत आहे, असे पत्र काढून शाळा बंद करून तेथील विध्यार्थी स्थालांतरित करावे, असे शाळा प्रशासनाला नोटीस द्वारे कळवून शाळेत जाऊन नोटीस बोर्ड लावला होता. तरीही शाळा चालूच होती. शाळा अनधिकृत असतानाही या शाळेने ७५ हजार ते १ लाख रुपये फीस विध्यार्थी व पालकांकडून घेवून ८५० अॅडमिशन या शाळेत घेतले होते. शाळा शिक्षण विभागाला व निवेदनाना देत देत नसल्याने मनसेने शाळेच्या गेटला कुलूप ठोको आंदोलन केले होते.
यावर शिक्षण विभागाने शाळेला १९ लाख दंड ही लावला होता तरीही शाळा प्रशासनाची मुजोरी करत दंडही भरायला तयार नव्हती. यानंतर मनविसेने शाळेंची तोडफोड करून आंदोलन केले. या आंदोलनानंतर मनसेच्या पदाधिकारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. तरीदेखील शाळा चालू होती. या शाळेविरोधात पालकांनी आमची फसवणूक झाली अशी तक्रारही पोलीस स्टेशन व शिक्षण विभागाला दिली होती. या सर्व प्रकारची दखल घेत अखेर शिक्षण विभागाने मंगळवारी शाळेला कुलूप ठोकून सील लावले यावेळी शिक्षण विभागासह पोलीस प्रशासन पण होते.