23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरनिलंग्यात अभिवादनासाठी जनसागर उसळला

निलंग्यात अभिवादनासाठी जनसागर उसळला

निलंगा :  प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सिंचनाचे जनक कर्मयोगी डॉ.शिवाजीराव पाटील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी निलंग्यात जनसागर उसळला. शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी डॉ. निलंंगेकर यांच्या कार्यावर व जीवनपटलावर मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र शिक्षण समितीच्या प्रांगणात असलेल्या स्मारकास फुले वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दादाबाग येथे हजारो नागरिकांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
यावेळी डॉ. निलंगेकर यांच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर नागरिकांमध्ये अश्रू अनावर झाले. सर्वधर्मीय महाविकास आघाडीच्या वतीने व पदाधिकारी कार्यकर्ते विविध फ्रंट सेलचे पदाधिकारी, नागरिकांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी स्वागत केले. जयंतीनिमित्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निलंगा शहरातील मुख्य शाखेसह तालुक्यातील इतर शाखेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी फिल्ड ऑफिसर संजय माने, शाखा तपासणीस युवराज जाधव, दीपक हल्लाळे, किसन जाधव, प्रेमनाथ मुगळे, दीपक पाटणकर, शाखा व्यवस्थापक शिवाजी वागदुरे, गटसचिव दत्तात्रय मरे , रूक्षराज बोयणे, अभिजीत बिरादार, रवी शिंगारे, चंचल माळी, संतोष  फटाले याच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
     यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके,  विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ अरंिवंद भातांबरे, अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे, पंडितराव भदरगे, मधुकर पाटील, निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल  सोनकांबळे, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सोनाजीराव कदम, निलंगा अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष लाला पटेल, निलंगा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजित नाईकवाडे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती राम गायकवाड, तानाजी निडवांचे, रमेश सोनवणे,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष प्रा.रोहित बनसोडे, प्रदेश जिल्हाध्यक्ष मानवाधिकार अ‍ॅड तिरुपती शिंदे, भीमशक्तीचे दिगंबर सूर्यवंशी, गणराज्य संघाचे रामंिलग पटसाळगे, लहुजी शक्ती सेनेचे गोंिवद सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद कदम, माजी सरपंच पंकज शेळके, व्यंकटराव शिंदे, पुरुषोत्तम कुलकर्णी, सुनील मूळे, परमेश्वर सुर्यवंशी, पुंडलिक बिराजदार, भरत शिंदे, सुनील मूळे,नागनाथ घोलप, भरत बियाणी, सचिन गायकवाड, विलास कांबळे आदीसह निलंगा मतदार संघातील व लातूर जिल्ह्यातील डॉ. निलंगेकर यांचे चाहते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR