25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeलातूरनिष्ठावंतांसह नव्यांसोबत पक्ष मजबूत करणार

निष्ठावंतांसह नव्यांसोबत पक्ष मजबूत करणार

निलंगा  : प्रतिनिधी
सध्या देशात धर्माच्या नावाखाली मताचे राजकारण केले जात असून २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खोटे बोलून मोदी सरकारने जनतेला फसवले आहे. सध्या कार्यकर्त्यांमध्ये काही बिनविचारी लोक अफवा पसरवीत आहेत. यापासून आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे. स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वा-यावर सोडणार नाही.तर त्यांच्या सोबतच राहून मी निलंगेकर यांच्या विकासाचा विचार घेऊन पक्ष संघटन मजबूत करून नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकसभेचे मताधिक्य वाढविणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर केले. येथील महाराष्ट्र विद्यालया आयोजित निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, देवणी अनंतपाळ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्या ते बोलत होते.
यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भाई नगराळे, काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, प्रदेश सरचिटणीस मोइज शेख, मल्लिकार्जुन मानकरी, निलंगा तालुकाध्यक्ष विजय पाटील, शिरूर आनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, देवणी तालुकाध्यक्ष अजित बेळकुने, पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, सुनिता  चोपणे ,सुरेंद्र धुमाळ, पंकज  शेळके हे मान्यवर उपस्थित  होते . प्रारंभी कर्मयोगी स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व विकासरत्न स्व.विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा.राजेंद्र सूर्यवंशी, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे, बालाजी वळसांगवीकर, वैजनाथ लुल्ले, लाला पटेल, संजय बिराजदार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस गजानन भोपणीकर, उपनगराध्यक्ष अमित मानकरी, माजी शहराध्यक्ष मोहम्मदखा पठाण हे उपस्थित
होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दयानंद चोपणे यांनी केले तर आभार देविदास पतंगे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR