परभणी : परभणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत मंगळवार, दि.२२ रोजी जाहीर होणार होणार आहे. या संबंधीची अधिसूचना तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे यांनी काढली आहे.
मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियमान्वये तसेच जिल्हाधिकारी परभणी यांच्या दि.७ रोजीच्या अधिसूचनेनुसार परभणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायची सरपंच पदे वर्ष २०२६ – ३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रवर्गनिहाय संख्या निश्चित करून महिलांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तहसीलदार, परभणी यांना प्राधिकृत केले आहे.
त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सरपंच पदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार आहे.
या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीसाठी संबंधित सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. राजपुरे यांनी केले आहे.