18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeपरभणीपुस्तके आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात : दहे

पुस्तके आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात : दहे

मानवत : तिकीट काढून आपण फक्त एकदाच तो चित्रपट पाहू शकतो. पण विकत घेतलेले पुस्तक आपण कितीही वेळा वाचू शकतो. सुजाण नागरिक घडण्यास आणि व्यक्तिमत्व विकासात सकस वाचनाची महत्त्वाची भूमिका आहे. म्हणून तरूण पिढी वाचनाकडे वळली पाहिजे, असे प्रतिपादन रेणकोजी दहे यांनी केले.

दि.१ ते १५ जानेवारी हा पंधरवडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केला आहे. वाचन संस्कृतीला संजीवनी मिळावी, विद्यार्थी, पालक, युवक, नागरिक यांच्या माध्यमातून वाचन चळवळ बळकट व्हावी हा यामागील हेतू आहे. याच उपक्रमाच्या पहिल्या दिवशी येथील साने गुरुजी वाचनालयात विद्यार्थी मित्रांशी संवाद साधताना वाचनालयाचे सचिव दहे बोलत होते.

विद्यार्थांसह शिक्षक संदीप काळे यावेळी उपस्थित होते. साने गुरुजी यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने या उपक्रमाला प्रारंभ झाला असून या संपूर्ण पंधरवड्यात शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक सहभागी होणार असून ग्रंथ प्रदर्शनाने या उपक्रमाची सांगता होईल,असे दहे यांनी सांगितले. ग्रंथपाल सुभाष बंडे आणि लिपिक प्रशांत कहेकर उपक्रम यशस्वीपणे पार पडावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR