24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रप्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत नाही

प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत नाही

नाराजीच्या वृत्तानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी
राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले. राज्यसभेच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते. यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. सुनेत्रा पवार यांना राज्यसभा उमेदवारी दिल्यानंतर भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, मीसुद्धा राज्यसभा लढण्यासाठी इच्छुक होतो. पण सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. पक्षात चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेला. माझ्या तोंडावर दिसत आहे का नाराज आहे? मी नाराज नाही, पक्षात सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात.
प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. माझ्यासोबत आनंद परांजपे इच्छुक होते. १३ लोक इच्छुक होते म्हणताय मग सगळ्यांना उमेदवारी देणे शक्य आहे का? एकालाच उभा करायचंय, तर सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झालं असेही भुजबळांनी सांगितले.

पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो. मी अपक्ष नाही. पक्षाचा कार्यकर्ता, मंत्री, नेता म्हणून पक्षाचा जो निर्णय असेल त्यानुसार काम करावे लागते. काही बंधने असतात पक्षाची असे भुजबळ म्हणाले. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून डावलले जात असल्याच्या चर्चा होत आहेत. याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, मी कालच्या बैठकीला उपस्थित होतो. मग मला कुठे डावलले जात आहे?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR