प्रा. शिवराज मोटेगावकरला ९ दिवस सीबीआय कोठडी

पेपरपुटीच्या रॅकेटचा मोटेगावकर मोठा भाग
सीबीआयचा दावा, पुण्यात केली अटक

पुणे : प्रतिनिधी
देशभरात खळबळ उडवून देणा-या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडताच सीबीआयने कारवाईचा धडाका सुरू केला. चौकशीत लातूर कनेक्शनही समोर आले. त्यामुळे आधी प्रा. पी. व्ही. कुलकर्णीला अटक झाली. त्यानंतर संशय बळावल्याने लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसच्या प्रा. शिवराज मोटेगावकरची दोनवेळा सखोल चौकशी केली आणि महत्त्वाचे पुरावे हाती लागताच आज पुण्यात अटक केली. नीट पेपरफुटीत पी. व्ही. कुलकर्णीसोबत मोटेगावकरचा सहभाग असल्याचा दावा सीबीआयने केला. त्यानंतर सीबीआय कोर्टात हजर करताच ९ दिवसांची कोठडी सुनावली. या प्रकरणी अटक झालेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. पेपरफुटीत लातूरचे नाव आल्याने राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नीटची परीक्षा ३ मे रोजी देशभरात झाली. जवळपास २३ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. मात्र, त्यानंतर पेपरफुटीचा प्रकार समोर येताच ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याचवेळी या धक्कादायक प्रकाराचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयनेही लगेचच तपासाची चक्रे फिरवून धाडसत्र आणि चौकशीचा ससेमिरा सुरू केला. यात सर्वप्रथम नाशिक ते हरियाणा, राजस्थानचे धागेदोरे सापडले. त्यानंतर पुणे, अहिल्यानगर, लातूरचे कनेक्शन समोर आल्याने सीबीआयच्या पथकाने लातुरात प्रथम निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीला उचलले आणि त्यानंतर आरसीसी क्लासेसचे प्रमुख प्रा. शिवराज मोटेगावकरची प्रथम १५ मे रोजी ८ तास चौकशी केली. त्याचवेळी संशयास्पद कागदपत्रांसह लॅपटॉप, मोबाईल जप्त केला. त्यानंतर मिळालेल्या पुराव्याआधारे त्यांना पुण्यात बोलावून घेतले आणि १७ मे रोजी धाडी टाकून रात्रीपासून चौकशी सुरू केली. १० तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने मोटेगावकरला दि. १८ मे रोजी सकाळी प्रथम ताब्यात घेतले आणि त्यानंतर अटक केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आरसीसी क्लासेसमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.

सीबीआय चौकशीत नीट परीक्षा होण्याच्या १० दिवस अगोदर म्हणजेच २३ एप्रिल रोजीच प्रा. मोटेगावकरने केमिस्ट्रीचा पेपर मिळविला होता. त्यामुळेच आरसीसीच्या मॉक टेस्टमध्ये नीट पेपरमधील बरेच प्रश्न पाहायला मिळाले. यासोबतच त्याच्या मोबाईलमध्ये नीटची प्रश्नपत्रिकाही आढळून आली आणि मोटेगावकर सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीसोबत पेपरफुटीत सहभागी होता, हेही समोर आले. त्यामुळे सीबीआयने मोटेगावकरला अटक केली. दरम्यान, लातूरमध्ये अजूनही सीबीआयचा तपास सुरूच असल्याचे समजते. तसेच काही डॉक्टर आणि विद्यार्थी, पालकही रडारवर असून, त्यांचीही चौकशी सुरू असल्याचे समजते.

याच कारणामुळे सीबीआयच्या पथकाने आधी लातूरमध्ये आरसीसी क्लासेसचे कार्यालय आणि मोटेगावकर यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतली होती. प्रा. मोटेगावकर यांचे कार्यालय, निवासस्थानातून कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल संच जप्त केला. यातूनच पेपरफुटीचे बरेच पुरावे हाती लागले. त्यामुळे ही अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर पुण्यातील सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी तपास अधिका-यांना मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका आहेत, हे तुम्हाला कसे कळले, असा प्रश्न केला, त्यावर निवृत्त प्राध्यापक कुलकर्णी हा मोटेगावकरसोबत संपर्कात होता. त्यातून ही बाब समोर आल्याचे सांगितले. त्यानंतर मोटेगावकरला ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. आता मोटेगावकरचा दिल्लीत चौकशी होणार आहे.

१० दिवसआधीच
मिळाला होता पेपर!
नीट परीक्षेच्या १० दिवसांआधीच प्रा. मोटेगावकरला प्रश्नपत्रिका मिळाली होती. त्याने ती अनेक विद्यार्थ्यांना दिल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली. मात्र, त्याने विद्यार्थ्यांची नावे सांगितली नाहीत. या पेपरफुटीमुळे नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लातूर, नांदेडच्या पालक,
विद्यार्थ्यांची चौकशी
पेपरफुटी प्रकरणी प्रा. मोटेगावकरची पुण्यात चौकशी होत असताना नांदेड आणि लातूरमधील विद्यार्थी आणि पालकांनाही पुण्यात बोलावले आणि सोमवारी त्यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये लातूर येथील २ डॉक्टर आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. पेपरफुटीशी पालक, विद्यार्थ्यांचा संबंध आहे का, याचा तपास सीबीआय करीत आहे. याच कारणावरून रविवारी नांदेड येथे कदम कुटुंबीय, विद्यार्थिनीची चौकशी केली होती.

कारवाईचा घटनाक्रम
-नीट पेपरफुटीवरून लातूर कनेक्शन समोर येताच दि. १४ मे रोजी रात्री सीबीआयची २ पथके लातुरात दाखल.
-लातुरातील निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीला रात्रीच ताब्यात घेऊन चौकशी. त्यानंतर पुण्यात चौकशी करून अटक
-पेपरफुटीत सहभागाच्या संशयावरून १५ मे रोजी सकाळी सीबीआयचे पथक प्रा. मोटेगावकरच्या आरसीसी कार्यालयात
-कार्यालयात सलग ८ तास चौकशी आणि मोबाईल, लॅपटॉप जप्त
-चौकशीदरम्यान प्रा. मोटेगावकरनी पेपर लिक प्रकरणी हात झटकले
-त्यानंतर मोबाईलमध्ये उडवलेला डाटा सीबीआयला सापडला, पेपरफुटीचे धागेदोरेही सापडले
-दुस-या दिवशी प्रा. कुलकर्णीच्या चौकशीतून प्रा. मोटेगावकरचा सहभाग समोर आला
-१७ मे रोजी मोबाईल आणि लॅपटॉप घेण्यासाठी प्रा. मोटेगावकरला पुण्यात बोलावले
-१७ मे रोजीच सीबीआयचे पुन्हा आरसीसीवर छापे आणि पुण्यात प्रा. मोटेगावकरांची १० तास चौकशी
-पुरावे हाती लागताच १८ मे रोजी सकाळी सीबीआयने घेतले ताब्यात, त्यानंतर केली अटक
-याच दिवशी सीबीआयच्या न्यायालयात हजेरी, ९ दिवसांची सीबीआय कोठडी मिळाली
-रात्री चौकशीसाठी दिल्लीला हलविले

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23
Video thumbnail
येलदरी जलाशयात मासेमारी नाकारल्याने मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
03:22
Video thumbnail
Nanded|कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाही-आ.हेमंत पाटील
03:09
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका सुरूच; लातूरचे FDA प्रशासन अजूनही झोपेत?
02:05
Video thumbnail
Latur Traffic Police|जीवघेण्या पद्धतीने वाहन अडवणारा ट्रॅफिक पोलीस निलंबित...
02:28
Video thumbnail
Latur MIDC|22 तासांच्या झुंजीनंतर MIDC मधील भीषण आग आटोक्यात; 5 कोटींचे नुकसान
03:48
Video thumbnail
धावत्या बाईकस्वाराला पाडणे पडले महागात; लातूरमध्ये 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर ट्रॅफिक पोलीस निलंबित!
00:19
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13

Latest news