18.7 C
Latur
Wednesday, December 17, 2025
Homeलातूरप्लायवुडच्या दुकानाला आग; लाखोंचे नुकसान 

प्लायवुडच्या दुकानाला आग; लाखोंचे नुकसान 

लातूर : प्रतिनिधी
येथील रिंग रोडवरील सोहम डोअर इंडस्ट्रीज या प्लायवुडच्या दुकानाला दि. १४ मे रोजी मध्यरात्री भीषण आग लागली. यात दुकानातील सर्व प्लायवुड व इतर साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचेकारण मात्र अद्याप समजु शकले नाही.
लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यात आलीय. मात्र या आगीत सोहम डोअर इंडस्ट्रीज या प्लायवूडच्या दुकानांमध्ये प्लायवूड तसेच फायबरचे साहित्य  जळून खाक झाले आहेत. आगीमुळे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक गोपाळ पांचाळ यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR