29 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeनांदेडबसमध्ये चढताना वृध्दाच्या खिश्यातून ४८ ग्राम दागिने पळविले

बसमध्ये चढताना वृध्दाच्या खिश्यातून ४८ ग्राम दागिने पळविले

मुखेड : प्रतिनिधी
बोरगाव येथील जेष्ठ नागरिक गणपतराव शिंदे हे त्यांची मुलगी तिरुपतीला देवदर्शनासाठी जाणार असल्यामुळे मुलीला भेटण्यासाठी तिच्या गावी गेले तेव्हां त्यांची मुलगी आपण तिरुपती जात असल्याने आपल्या घरी कोणी रहात नाही म्हणून दागिने डबीत टाकुन वडिलांकडे दिले.शिंदे मुलींच्या गावाहून दागिने घेवुन परत आपल्या गावाकडे जाण्यासाठी मुखेड बसस्थानकावर आले असता गावाकडे जाणा-या बसमध्ये चढत असताना या वृद्धाच्या खिश्यातील ४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी पळवीले आहे.सदर घटना ही ०२ एप्रिल रोजी दुपारच्या दरम्यान मुखेड बसस्थानकात घडली आहे.चोरी गेलेल्या दागिण्यांची अंदाजित किंमत १ लाख ४४ हजार रुपये एवढी आहे याप्रकरणी मुखेड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुखेड तालुक्यातील मौजे बोरगाव येथील गणपत धोंडीबा शिंदे वय ६० वर्ष यांची मुलगी तिरुपती येथे देव दर्शनासाठी जाणार होती.या काळात घरी कोणी रहात नसल्याने त्यांच्या मुलीने हार, लॉकेट व सोन्याचे काड्या हे दागिणे एका स्टीलच्या डबीत ठेवून तो वडिलांकडे दिला होता.मुलीला पाठवून २ एप्रिल रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या दरम्यान ते मुखेड बसस्थानकावर मुखेड-राजुरा बसने गावाकडे जाण्यासाठी निघाले तेव्हां ते बसमध्ये चढताना चोरट्यांनी खिशात ठेवलेला दागिण्यांचा डबा लंपास केल्याची घटना घडली.सदर प्रकरणाची माहिती मुखेड पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोहेकॉ भास्कर मुंडे, पोहेकॉ फयाजोद्दीन शेख, पो.ना.गंगाधर चिंचोरे, पोकॉ किरण वाघमारे, पोकॉ मारोती मेकलेवाड.

पोकॉ यादव ईबीतवार यांनी घटनास्थळी जावून बस स्थानकातील व इतर ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले व बसमध्ये चौकशी केली तेव्हां सिसीटीव्ही कॅमे-यात चार संशयित आरोपी आढळले आहेत त्यामुळे चोरटे लवकरच हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याप्रकरणी गणपत धोंडीबा शिंदे वय ६० वर्ष राहणार बोरगाव यांच्या फिर्यादिवरुन मुखेड पोलिस स्टेशन येथे दि.०२ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता कलम ३७९ भादवी नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असुन सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR