28 C
Latur
Wednesday, May 15, 2024
Homeलातूरलातूर मल्टीस्टेटच्या ठेवीमध्ये ३२ कोटींची वाढ 

लातूर मल्टीस्टेटच्या ठेवीमध्ये ३२ कोटींची वाढ 

लातूर : प्रतिनिधी
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात लातूर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह के्रडीट सोसायटी लि. लातूरमध्ये १६३.२० कोटींच्या ठेवी आहेत. ९८.८० कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. वार्षिक व्यवसाय एकुण २४६.६५ कोटी झाला आहे. एकुण गुंतवणुक ५५ कोटींची आहे. वसुली भाग भांडवल १.९४ कोटीचे असून २ कोटी ३७ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. ३१ मार्चअखेर संस्थेची सभासद संख्या ३५ हजार एवढी आह. संस्थेने सर्वोत्तम कामगिरीचा आलेख कायम ठेवल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे. जी. सगरे यांनी दिली.
लातूर शहरात संस्थेची स्व: मालकीची मुख्य कार्यालयाची जागा आहे. लवकरच त्या जागेवर बांधकाम करुन मुख्य कार्यालय स्वत:च्या जागेत स्थलांतरीत होत आहे. संस्थेच्या शाखा महाराष्ट्रात तसेच कर्नाटक राज्यामध्ये कार्यरत आहेत. संस्थेच्या कार्यरत शाखा या लातूर जिल्ह्यात गुळ मार्केट लातूर, अंबाजोगाई रोड लातूर, बोरी, शिरुर अनंतपाळ, देवणी, अहमदपूर, औसा, उदगीर येथे आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा तसेच कर्नाटकातील बसवकल्याण या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत. अल्प कार्यकाळामध्ये सर्व शाखा प्रगती पथावर पोहोचल्या आहेत. या आर्थिक वर्षात संस्थेच्या तसेच ग्राहकांच्या संस्थेबद्दलच वाढता विश्वास व संपर्क यामुळे संस्थेने घेतलेल्या निर्णयानूसार अंबाजोगाई व पुणे येथे शाखा सुरु होत आहे.  सोने तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, पगार तारण कर्ज तसेच महिला बचत गट, शेतकरी कर्ज योजना, दुग्ध व्यवसाय कर्ज, माल तारण कर्ज सुविधा उपलब्ध असून विधवा महिला, अपंग, आजी-माजी सैनिकांसाठी ठेवीवरील व्याजदर अर्धा टक्के वाढ देण्यात येत आहे.
संस्थेमार्फ तआर्थिक सेवेसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये शालेय विद्यार्थी दत्तक घेण, रक्तदान शिबीर, वृद्धाश्रमामध्ये तसेच अनाथाश्रमामध्ये अन्नदान व वस्त्रदान, वृक्षारोपन, अन्नछत्र, अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये संस्थेचे योगदान असते.  मागील आर्थिक वर्षामध्ये संस्थेच्या प्रगतीमुळे संस्थेस बॅको ब्ल्यू रिबन पुरस्काराने तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय सहकारातील उत्तूंग कामगिरीचे सात वेळा पुरस्कार सन्मानीत केले आहेत.  संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थापक अध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, संस्थेमध्ये कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी, सभासत, ठेवीदार, कर्जदार, ग्राहकांचे सहकार्य लाभले असल्याचे संस्थापक अध्यक्ष जे. जी. सगरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR