24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये गोळीबार, २ जखमी

बीडमध्ये गोळीबार, २ जखमी

बीड : प्रतिनिधी
बीडच्या अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीडमध्ये झालेल्या या गोळीबाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलिस सध्या अधिक तपास करत आहेत. बीड-लातूर रोडवरील सेलू आंबा टोलनाक्यावर ही घटना घडली. या घटनेमध्ये दोन युवक जखमी झाले आहेत.

संदीप तांदळे आणि अभय पंडित अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने पोलिसही सतर्क झाले आहेत. सध्या पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

दरम्यान, दुसरीकडे बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा येथे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना या सभेला येता आले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मोबाईलहून उपस्थितांना व्हर्चुअल मार्गदर्शन केले. पंकजा मुंडे शुक्रवारी नाशिकच्या दौ-यावर होत्या. या दरम्यान नाशिकमधील सभा आटोपून त्यांना धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी शिरसाळा येथे पोहोचायचे होते. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना पोहोचता आल्े नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR