बीड : प्रतिनिधी
बीडमधील गेवराई शहरात धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या लग्नाचे स्वप्न उराशी बाळगणा-या बापाने खासगी बँकेसमोरच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गेवराईमधील छत्रपती मल्टीस्टेट या खासगी बँकेसमोर ठेवीदाराने गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश आत्माराम जाधव असे आयुष्याचा दोर कापणा-या व्यक्तीचे नाव आहे. या धक्कादायक घटनेनंतर गेवराईमध्ये एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बँकेच्या गेटवर गळफास घेऊन बापाने आयुष्याचा दोर कापला. गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील सुरेश आत्माराम जाधव नामक चाळीस वर्षे व्यक्तीने आत्महत्या केली. ११ लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार पैसे मागूनही बँकेकडून पैसे दिले जात नसल्याने जाधव यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावमधील ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत ११ लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ५ लाख रुपये अडकले होते. मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. मात्र सतत बँकेच्या फे-या मारूनही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.