वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
बी-२ बॉम्बर या विमानाची प्रॉपल्शन सिस्टीम बनविण्यात भारतीय अमेरिकी म्हणजेच अनिवासी भारतीय नागरिकाची महत्वाची भूमिका होती. एफबीआयनुसार गोवाडिया याचे आताचे वय ८२ वर्षे आहे. ऑक्टोबर २००५ मध्ये एका तक्रारीच्या आधारे त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती.
नोशीर गोवाडिया असे या भारतीयाचे नाव आहे. गोवाडिया हा पेशाने इंजिनिअर आहे. सध्या तो तुरुंगात ३२ वर्षांची शिक्षा भोगत आहे. मुंबईत जन्मलेल्या गोवाडिया याने या विमानासाठी जेव्हा काम केले तेव्हाच त्याने चीनला अमेरिकेची गोपनिय माहिती देखील पुरविली. या माहितीवरून चीनने आपल्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा माग अमेरिकेला काढता येऊ नये म्हणून क्रूझ क्षेपणास्त्र एक्झॉस्ट सिस्टम विकसित केली होती.
१९६८ ते १९८६ दरम्यान सुमारे २० वर्षे बी-२ बॉम्बर्स निर्माण करत असलेल्या टीमसोबत त्याने काम केल्याचे समोर आले होते. या विमानासाठी त्याने यूनिक प्रॉपल्शन सिस्टीम आणि लो ऑब्जर्वेबल कॅपेबिलिटीचा विकास केला. १९९७ पर्यंत ते अमेरिकेच्या अशा लढाऊ विमानांच्या निर्मितीवर काम करत होता.
यानंतर गोवाडिया याने २००३ ते २००५ या काळात त्यांनी ६ वेळा चीन वारी केली आणि एफबीआयच्या नजरेत आला. चीनमध्ये डिझाइन, चाचणी आणि चाचणी डेटा विश्लेषण आदी कामांद्वारे चीनला मदत केली. तो याकाळात चीनसाठी काम करत होता. याच्या बदल्यात चीनने त्याला $११०,००० दिले होते. अमेरिकेचा गोपनिय डेटा तो चीनला सेवा पुरवत असला तरी अमेरिकेसाठी ती गद्दारी होती. कारण चीन तेव्हा स्टील्थ नोजल आणि क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करत होता. एफबीआयच्या चौकशीनंतर २०१० मध्ये त्याला दोषी ठरविण्यात आले आणि २०११ मध्ये त्याला ३२ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.