22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeबुलेट ट्रेनसाठी १०० मीटर लांब, १४.६ मीटर उंचीचा पूल तयार

बुलेट ट्रेनसाठी १०० मीटर लांब, १४.६ मीटर उंचीचा पूल तयार

 

मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान सुरु होणा-या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली दरम्यान १०० मीटर लांब आणि चार मजली इमारतीबरोबर असणारा पूल तयार केला गेला आहे. हा पूल तामिळनाडूमधील त्रिचीमध्ये तयार केला गेला. त्यानंतर ट्रेलर आणि ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मुंबईत आणला गेला. हा पूल जोडताना त्या ठिकाणी असलेल्या रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक लोकांचा जणू श्वासच थांबला होता.

नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशननुसार ५०८ किमी लांब मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्­टमध्ये एकूण २८ स्­टील ब्रिज आहेत. त्यातील दादरा आणि नगर हवेली येथील पूल चौथा आहे. हा पूल १४६४ मेट्रीक टनाचा आहे. त्याची उंची १४.६ मीटर आणि रुंदी १४.३ मीटर आहे. हा संपूर्ण पूल ‘मेक इन इंडिया’च्या प्रकल्पावर आधारित आहे. त्यासाठी जपानच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

सुरक्षितता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेची उच्च पातळी राखून बुलेट ट्रेन प्रकल्प तयार केला जात आहे. जपानी तंत्रज्ञाचा फायदा घेऊन ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत हा मार्ग तयार होत आहे. भारत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्वत:ची तांत्रिक आणि भौतिक संसाधने वाढवत आहे. या प्रकल्पासाठीचा हा पोलादी पूल त्याचे उदाहरण आहे.

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली हाय स्पीड रेल्वे लाइन निर्मितीचे काम सध्या वेगाने सुरु आहे. गुजरातमधील नऊ आणि महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमधून ही बुलेट रेल्वे जाते. महाराष्ट्रातून ५६ किमी, नगर हवेलीत ४ किमीचा रेल्वे मार्ग आहे. या प्रकल्पात १२ स्­टेशन बनवण्यात येणार आहे. रेल्वेचा वेग ३२० किमी प्रतीतास असणार आहे. या रेल्वेमुळे मुंबई ते अहमदाबाद अंतर दोन तासांत गाठता येणार आहे.

बुलेट ट्रेन सहा मार्गांवर चालवण्याची योजना आहे. दिल्­ली-अमृतसर, हावडा-वाराणसी-पटना, दिल्ली-आग्रा-लखनऊ-वाराणसी, दिल्ली -जयपूर-उदयपूर-अहमदाबाद, मुंबई-नाशिक-नागपूर, मुंबई-हैदराबाद कॉरिडोर असे हे मार्ग आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR