28.8 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार पक्षाला सोडचिठ्ठी

भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार पक्षाला सोडचिठ्ठी

नगर : अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. विद्यमान खासदार, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. अशातच अहमदनगरमधील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे राजीनामा देणार असल्याची माहिती मिळतेय. सुजय विखे पाटील यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्याने शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत.

त्यामुळे भाजपचे जवळपास १०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामूहिकरीत्या भाजपचा राजीनामा देणार आहेत. भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर या शेकडो कार्यकर्त्यांनी सामूहिकरीत्या भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांच्यावर नाराजी दाखवून भाजपचे ओबीसी प्रदेश सदस्य सुनील रासने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात येऊन त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. विद्यमान खासदार यांचा संपर्क आणि कामाची व्याप्ती कमी झाली आहे. साखर वाटप कार्यक्रम असे इव्हेंट त्यांनी केले मात्र ते फेल ठरले आहेत. मी ४० वर्षे झाले पक्षाचा कार्यकर्ता आहे. राम शिंदे, कर्डिले, मोनिका राजले किंवा विवेक कोल्हे यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे, मी पक्षाचा राजीनामा देत आहे. आमची अहमदनगर दक्षिण ही जागा आली पाहिजे यासाठी मी राजीनामा देत असल्याचे रासने यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR