34.1 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिस भरतीची तयारी करणा-या तरुणीवर बलात्कार

पोलिस भरतीची तयारी करणा-या तरुणीवर बलात्कार

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस भरतीची तयारी करणा-या एका तरुणीवर पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या वर्दीला काळिमा लावणा-या आरोपीने तरुणीचा जामखेड येथील एका रुग्णालयात गर्भपात देखील केला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण माणिक महामुनी (वय ३८, रा. नागपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी ही पोलिस भरतीची तयारी करते. यातूनच तिची आरोपी महामुनीशी ओळख झाली असता त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.

यासोबतच आरोपीने तिला त्याच्या शिवाजीनगर येथील घरी नेत तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले. यातून पीडित मुलगी ही गर्भवती झाली. त्यानंतर त्याने नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात असलेल्या एका रुग्णालयात तिचा गर्भपात केला. याप्रकरणी कोणाला काही सांगितल्यास तरुणीला जीवे मारण्याची धमकी देखील आरोपी पोलिस उपनिरीक्षकाने दिल्यानंतर तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक काळे पुढील तपास करत आहेत. यामुळे रक्षकच भक्षक बनले अशी भावना पुणेकरांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR