20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपने डॉग स्कॉड पाळलंय

भाजपने डॉग स्कॉड पाळलंय

सांगली : प्रतिनिधी
भाजपने एक डॉग स्कॉड पाळलं असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या वक्तव्याला समर्थन आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीदेखील जयंत पाटील यांनी केली.

दरम्यान, शेतकरी नेते आणि महायुतीमधील घटक असलेले सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना त्यांच्या शारीरिक व्याधींवर भाष्य केले. भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या सांगलीतील जतमध्ये निवडणूक प्रचार सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांच्या जिभेवरील नियंत्रण सुटले. त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत.

सांगलीत पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य हे दुर्दैवी आहे. भाजपने स्तर किती खाली नेला याचे हे द्योतक आहे. भाजपने अशी वक्तव्ये करणारे डॉग स्कॉड बाळगले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे याला समर्थन आहे का याचा त्यांनी खुलासा करावा अशी मागणीदेखील जयंत पाटील यांनी केली. सदाभाऊंच्या वक्तव्यांवर महाराष्ट्रातील जनता भाजपला प्रायश्चित घेण्यास भाग पाडेल असेही त्यांनी म्हटले. भाजपमधील काही लोक शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करतात आणि आमदारकी मिळवत असतील तर भाजपचे विचार त्यांना लखलाभ असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR