27.2 C
Latur
Friday, September 27, 2024
Homeउद्योगभारतीय एके-२०३ रायफलला मुस्लिम राष्ट्रांकडून मोठी मागणी

भारतीय एके-२०३ रायफलला मुस्लिम राष्ट्रांकडून मोठी मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या भारतात तयार होणा-या कलाश्निकोव्ह एके-२०३ असॉल्ट रायफलला मोठी मागणी आहे. खास करुन आफ्रीकी आणि मिडल इस्ट देशातून या रायफलला खूप मागणी आहे. या रायफलची निर्मिती रशिया आणि भारत मिळून होत आहे. इंडो रशियन रायफल्स लिमिटेड द्वारे भारतात या रायफलची निर्मिती केली जात आहे. ब्रह्मोस क्रुझ मिसाईल, आर्टिलरी गन, लाईटवेट टॉर्पेडो सह अनेक शस्रास्रांसह आता कलाश्निकोव्ह एके-२०३ देखील या मालिकेत रशिया आणि भारत मैत्रीतून तयार केली जात आहे.

रशिया आणि भारतीय संयुक्तपणे तयार करीत असलेल्या कलाश्निकोव्ह एके-२०३ असॉल्ट रायफलची मागणी वाढली आहे. आफ्रीकन आणि मध्य पूर्वेतील मुस्लीम देशांत एके-२०३ असॉल्ट रायफलच्या वाढत्या मागणीला अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देश जबाबदार ठरले आहेत. डीफेन्स सेक्टरच्या तज्ज्ञांच्या मते ही वाढती मागणी भारताचे आफ्रीकी आणि मध्य पूर्वेतील देशांशी संबंध वाढवू शकते. तसेच डिफेन्स सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि भारताच्या आत्मनिर्भर मोहीमेला यामुळे उभारी मिळणार आहे.

ही रायफल एके-२०० रायफलीची अत्याधुनिक आवृत्ती आहे. कलाश्निकोव्ह एके-२०३ ची फायरिंग रेंज ४००-८०० मीटर आहे. एका मिनिटाला ही ७०० राऊंड फायर करते. यात डिटेचेबल मॅगझीनचा वापर होतो. मार्चमध्ये या रायफलीच्या सुरुवातीच्या डिलिव्हरी आधीच भारतीय सैन्याने हीच्या चाचण्या केल्या आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. ही विश्वासार्ह रायफल म्हणून ओळखली जाते. हीची अचूक क्षमता वाढण्यासाठी तिला अनेक तांत्रिक बाबी जोडल्या आहेत. ऑप्टीक, कोलीमेटर, नाईट आणि थर्मल इमेजिंग स्कोप लावण्याची सोय देखील आहे. ३.८ किलो वजनाची ही रायफल कोणत्याही वातावरणात निराश करीत नाही. अमेठी येथील कोरवा ऑर्डिनन्स फॅक्ट्रीत आत्मनिर्भर मोहिमेंतर्गत या रायफलची निर्मिती करण्यात आली आहे.

भारतीय एके-२०३ ला मागणी का ?
मध्य पूर्व आणि आफ्रीकी देशात कलाश्निकोव्ह एके-२०३ या रायफलला मागणी वाढण्यामागे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांद्वारा रशियावर निर्बंध घालणे जबाबदार ठरले आहे. या प्रतिबंधांमुळे या रायफली रशियातून विक्री होणे बंद झाले. त्यामुळे भारत आणि रशियात तयार होणा-या या रायफली विकून भारताचा फायदा झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR