24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeराष्ट्रीय‘भुज-अहमदाबाद’ मेट्रो आता ‘नमो भारत रॅपिड रेल’

‘भुज-अहमदाबाद’ मेट्रो आता ‘नमो भारत रॅपिड रेल’

अहमदाबाद : भुज-अहमदाबाद दरम्यान धावणा-या वंदे मेट्रोचे नाव उद्घाटनाच्या काही तास आधी बदलण्यात आले. ही ट्रेन आता ‘नमो भारत रॅपिड रेल’ म्हणून ओळखली जाईल. भुज-अहमदाबाद दरम्यान धावणा-या या मेट्रो सेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भुज रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला.

दरम्यान, मोदींच्या उध्दाटनाच्या काही तास अगोदरच या वंदे मेट्रोचे नाव बदलण्यात आल्यामुळे आर्श्चय व्यक्त केले जात असून, रेल्वेकडून कोणत्या कारणामुळे वंदे मेट्रोचे नाव बदलण्यात आले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

रेल्वे प्रवक्तयाने दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन भुज ते अहमदाबाद हे ३५९ किमीचे अंतर ५:४५ तासांत पूर्ण करेल. तसेच ही गाडी नऊ स्थानकांवर थांबणार आहे. मंगळवारपासून या ट्रेनमधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच, भुज ते अहमदाबाद दरम्यानचे भाडे ४५५ रुपये असेल. रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रो ट्रेनचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेनमध्ये १२ डबे बसवण्यात आले आहेत. यामध्ये ११५० प्रवासी प्रवास करू शकतील. ट्रेनमधील आसनांची रचना अर्गोनॉमिकली करण्यात आली आहे. वातानुकूलित केबिन देखील आहेत. ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. त्याचा कमाल वेग ११० किमी/तास असेल.

ट्रेन कवचने सुसज्ज
मंत्रालयाने म्हटले आहे की, एर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या आसनांच्या सुविधा, पूर्णपणे वातानुकूलित केबिन आणि मॉड्यूलर इंटीरियरसह, वंदे मेट्रो इतर महानगरांपेक्षा चांगली असल्याचे सिद्ध होईल. टक्कर टाळणे, आग शोधणे आणि आपत्कालीन प्रकाशाची वैशिष्ट्ये याशिवाय कवच यासारख्या प्रगत सुरक्षा यंत्रणांनी मेट्रो सुसज्ज आहे. मेट्रोमध्ये दिव्यांगांसाठी शौचालये, पूर्णपणे सीलबंद लवचिक गँगवे आणि खाद्य सेवा यासारख्या इतर सुविधा असतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR