लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात जाहिरात फलक, बॅनर्स, होर्डींग्जण लावणेसाठी महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे. तथापि शहरामध्ये सद्य:स्थितीत लावण्यात आलेले अनधिकृत, बॅनर, स्टिकर, बोर्ड, जाहिरात फलक, पत्रके, गुंडाळफळी, कापडी फलक इत्यादी अनाधिकृत जाहिरात फलक काढण्यात आले.
लातूर शहरातील अनधिकृत बॅनर, जाहिरात फलक, पोस्टार्स, होर्डींग्जवर महानगरपालिकेमार्फत कार्यवाही सुर आहे. तरी लातूर शहरातील लाईटचे पोलवर, रस्ता दुभाजकामध्ये, चौकामध्ये, झाडांना टांगत्या पध्दतीने लावण्यात आलेले तात्पुरत्या स्वरुपामध्ये अनधिकृत बॅनर, स्टिकर, बोर्ड, जाहिरात फलक काढणयात आले. नागरिकांनी अनाधिकृतपणे जाहिरात फलक लावू नये, अन्यथा संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.