22.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeराष्ट्रीयमराठी भाषकांच्या महामेळाव्याला बंदी

मराठी भाषकांच्या महामेळाव्याला बंदी

बेळगावात जमावबंदीचा आदेश, तणाव वाढला
बेळगाव : वृत्तसंस्था
शहरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी बंदी घातली आहे. तसेच बेळगावमध्ये ज्या ५ ठिकाणी हा महामेळावा पार पडण्याची शक्यता आहे, त्या पाचही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला. सोमवारपासून बेळगाव शहरातील विधानसौध या ठिकाणी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मराठी भाषकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगाव शहर पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला तर जमावबंदी आदेश लागू केला असला तरी कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेणारच, असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केला. बेळगावच्या धर्मवीर संभाजी चौक येथे सोमवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस खात्याने धास्ती घेऊन शहरातील धर्मवीर संभाजी चौक, छत्रपती संभाजी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, लेले ग्राउंड, व्हॅक्सिन डेपो अशा पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

महाराष्ट्रात गेल्यावरच
आंदोलन बंद होणार
एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी महाराष्ट्रात जाण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. महाराष्ट्रात गेल्यावरच हे आंदोलन बंद होईल. यापूर्वीदेखील अनेकदा पोलिस खात्याने दबाव तंत्र वापरून आंदोलनाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मराठी माणसाने दाद दिली नाही, असे म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR