महायुतीचे ६ उमेदवार बिनविरोध

– विधान परिषद निवडणूक, मतदानाआधीच महाविकास आघाडीला धक्का

मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारचा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस नाट्यमय घडामोडींनी गाजला. ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघात आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतल्याने मतदानाआधीच ५ जागा गमावण्याची नामुष्की ओढवली तर अहिल्यानगरमध्ये भाजपचे प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात अपक्ष दत्ता पानसरे मैदानात होते. त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. परंतु अखेरच्या क्षणी त्यांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि अहिल्यानगर अशा ६ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

यामुळे कोकण मतदारसंघातून अनिकेत तटकरे, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखाणी, पुण्यातून राष्ट्रवादीचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, ठाकरे गटाच्या २ उमेदवारांनी परस्पर परस्पर माघार घेतल्याने शिवसेना ठाकरे पक्षाने कोकणातील उमेदवार बाळ माने आणि छ. संभाजीनगरच्या देवयानी डोणगावकर आणि त्यांचे पती कृष्णा डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली.

विधान परिषदेच्या स्थानिक मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. आज १७ पैकी ६ मतदारसंघात एकच उमेदवार रिंगणात असल्याने येथील निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे उर्वरित ११ मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी किंवा अपक्ष उमेदवार असा सामना होईल. महायुतीला अनेक मतदारसंघातील बंडखोरी शमविण्यात यश आले. मात्र, महाविकास आघाडीला ८ ठिकाणी झटका बसला. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड आहे. दरम्यान, नाशिक आणि जळगावात महायुतीत बंडखोरी झाल्याने भाजप, शिवसेनेची अडचण झाली आहे.

छ. संभाजीनगरमध्ये
लोखंडेंना ठाकरेंची साथ
शिवसेना ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरमधून देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीत त्यांचा अर्ज वैध ठरला होता. मात्र, देवयानी पाटील डोणगावकर यांनी आज परस्पर अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने देवयानी डोणगावकर आणि त्यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर या दोघांची पक्षातून हकालपट्टी केली आणि अपक्ष गणेश लोखंडे यांना पाठबळ दिले.

ठाणे, पुण्यात शरद पवार
गटाचे पांढरे निशाण
विधान परिषदेच्या ठाणे आणि पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांनी आज पांढरे निशाण दाखवले. ठाण्याचे उमेदवार अभिजित पवार आणि पुणे मतदारसंघातील उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आज आपले अर्ज माघार घेतले. त्यामुळे ठाण्यातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक तर पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली,
यवतमाळमध्ये काँग्रेसची माघार
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आज निवडणुकीतून माघार घेतली. अग्रवाल यांच्या माघारीने भाजपचे उमेदवार अरुण लखानी बिनविरोध निवडून आले. यवतमाळमध्ये काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी कालच माघार घेतली. आज अन्य अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले.

अहिल्यानगरमधून काँग्रेसने उमेदवारी दिलेले करण ससाणे यांनी माघार घेतली. मात्र, या मतदारसंघात अपक्ष दत्तात्रय पानसरे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. अखेरच्या क्षणी त्यांनी माघारीचा अर्ज दिला नसल्याचे सांगत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला. परंतु काही वेळानंतर दत्ता पानसरे यांनी माघार घेतली आणि अहिल्यानगरची जागा बिनविरोध निघाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने भाजपला दिलासा मिळाला. नांदेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवीण पाटील-चिखलीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे इथे महायुतीचे पारडे जड झाले.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
ठाणे : रवींद्र फाटक (शिंदे गट)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (अजित पवार गट)
पुणे : विक्रम काकडे (अजित पवार गट)
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिंदे गट)
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखानी (भाजप)
अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे (भाजप)

विधान परिषदेच्या लढती
सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)
जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)
सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)
नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील-सुखटनकर (काँग्रेस)
भंडारा-गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) विरुद्ध अविनाश ब्राम्हणकर (भाजप)
नाशिक : गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना)
अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित )
धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरे गट) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष)
छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (अपक्ष, ठाकरे गट)
नागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news