26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्रमहायुतीत भागीदार वाढवू नका : आठवले

महायुतीत भागीदार वाढवू नका : आठवले

पुणे : प्रतिनिधी रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पक्षाचा सच्चा सहकारी आणि महायुतीतील भागीदार आहे. महायुती परिपूर्ण झाली असून यापुढे त्यात भागीदार वाढवू नका,असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली.

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने ‘संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले बोलत होते,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे,, यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते मेळाव्याकरीता उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाच्या साथीने रिपब्लिकन पक्ष आपला विस्तार करत आहे.असे नमूद करून ते म्हणाले,पक्षाची देशभर बांधणी करत आहे.ईशान्य भारतामध्ये देखील रिपब्लिकन पक्षाने स्थान मिळवले आहे.कोंग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक आयोग व सत्ताधा-यांवर मतचोरीचा आरोप करीत आहेत. मात्र, हा आरोप निरर्थक असल्याचा दावा आठवले यांनी केला.मतदान केंद्रावर प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी असतात. . अशावेळी मतचोरी कशी शक्य आहे असा सवाल त्यांनी केला.काँग्रेसला लोक आता मत देत नाहीत.कारण त्यांना मत देऊन त्याचा उपयोग नाही,हे लोकांना उमगले आहे. विरोधी पक्षांबद्दल मतदाराला आत्मीयता राहिली नसल्यामुळे ते सातत्याने पराभूत होत आहेत,असे ते म्हणाले

पाटील म्हणाले,आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार, नगरपरिषद, नगर पंचायत मध्ये जे यश मिळाले तसेच यश १६ जानेवारी रोजी मिळेल त्यासाठी हा मेळावा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR