22.9 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeलातूरमांजरा साखर परिवाराकडून उसाचे विक्रमी गाळप

मांजरा साखर परिवाराकडून उसाचे विक्रमी गाळप

लातूर : प्रतिनिधी
राज्यातील साखर उद्योगात नावलौकिक असलेल्या लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर परिवारातील १० साखर कारखान्याकडून व्.िाद्यमान गळीप हंगामात २४ जानेवारीपर्यंत ३० लाख ६८ हजार ९३७ मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करण्यात आले असून त्यातून २९ लाख  ४५ हजार ९७० क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आह. मांजरा परिवारातील कारखाने अधिक क्षमतेने सुरु असल्याने दैनंदीन साधारणत:  ४० ते ४५ हजार मेट्रिक टन उसाचे  गाळप होत असून   राज्यात  मांजरा साखर परिवाराने गाळपात भरारी घेतली आहे
विद्यमान वर्षी गळीप हंगामात २३ जानेवारीअखेर परिवारातील  मांजरा साखर कारखाना ३ लाख ७१ हजार ८७० मेट्रिक टन, विकास सहकारी साखर कारखाना निवळी ३ लाख ६५ हजार ४००, विलास साखर कारखाना तोंडार २ लाख ९१ हजार ०३०, रेणा साखर कारखाना ३ लाख ३ लाख ९  हजार ७९०, जागृती शुगर ३ लाख ६९ हजार ८१० , ट्वेण्टी वन शुगर मळवटी ३ लाख २६ हजार ७२६ , ट्वेंटी वन शुगर सोनपेठ ५ लाख २ हजार ५८० , ट्वेंटी वन शुगर लोहा १ लाख ४२ हजार ४८६ , मारुती महाराज साखर कारखाना १ लाख २२ हजार २४५ तर मंगरूळ जिल्हा धाराशिव येथील मांजरा शुगर प्रा. ली. या साखर कारखान्याने २ लाख ६६ हजार ८३० मेट्रिक टन उसाचे  गाळप केलेले असून आजतागायत परिवारातील एकूण १० साखर कारखान्याकडून ३० लाख ६८ हजार ९५७ मेट्रिक टन उसाचे विक्रमी यशस्वी गाळप झाले आहे
विकासरत्न विलासराव देशमुख यांनी ३८ वर्षापूर्वी या मांजरा साखर कारखान्या पासून प्रारंभ केला तेथून परिवाराची सुरवात केली त्यांनी ज्या पद्धतीने साखर कारखाने शेतक-यांच्या उन्नतीसाठी चालले पाहिजे हा संकल्प केला होता त्याच पद्धतीने पुढे माजी मंत्री सहकार महर्षी मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी आजतागायत पारदर्शकता ठेवून सूक्ष्म नियोजन करत शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करीत उसाला अधिक भाव देण्याचा या परिवाराने प्रयत्न केला आहे. राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा आमदार व विलास साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अमित विलासराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव  देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मांजरा साखर परिवारातील सर्वच कारखाने सक्षमपणे चालवत नेत्रदीपक कामगिरी करीत  असताना आज परिवारातील साखर कारखाने शेतक-यांचे  मंदीर बनले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR