37.6 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले आय सपोर्ट डॉ. शिवाजी काळगे पोस्टरचे अनावरण

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले आय सपोर्ट डॉ. शिवाजी काळगे पोस्टरचे अनावरण

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांना समर्थन देण्यासाठी ८६८२८०१८०१ हा मोबाईल क्रमांक सुरु करण्यात आला आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १८ एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात या क्रमांकावर पहिला फोन करुन सर्वांसाठीच हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.
बाभळगाव निवासस्थानी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या आय सपोर्ट डॉ. शिवाजी काळगे पोस्टरचे अनावरण केले. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी स्वत: त्यांच्या मोबाईल वरुन ८६८२८०१८०१ या नंबरला कॉल केला व इतर सर्वांनीही या नंबरला संपर्क करुन लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना समर्थन द्यावे असे आवाहन केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इमरान सय्यद, लातूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशलेष मोरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव दिपक राठोड, विश्वजीत जाधव आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR