38.9 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeलातूरहजरत सुरत शाहवली दर्ग्यात विजयाची केली प्रार्थना

हजरत सुरत शाहवली दर्ग्यात विजयाची केली प्रार्थना

लातूर : प्रतिनिधी
देशात लोकसभा निवडणुका होत आहेत. देशाच आणि आपलं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. काँग्रेस पक्षाने नेहमी सर्वांना सोबत घेऊन पूढे जाण्याचा विचार केला. आज देशाला इमानदार लोकांची गरज आहे.  देश योग्य रस्त्यावर चालला पाहिजे यासाठी आम्ही लोकांना देशात बदल घडवण्याचे आवाहन करीत आहोत, असे त्यांनी सांगितले राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक  कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
लातूरातील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान हजरत सुरत शाहवली दर्गा येथे दर्शनासाठी व चादर चढवण्यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे आणि महाविकास आघाडीचे सहकारी यांच्या समवेत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख उपस्थित राहून डॉ. काळगे यांच्या विजयासाठी प्रार्थना केली. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी लातूर शहरातील हजरत सुरत शहावली दर्गा येथे चादर अर्पण करुन, लातूर लोकसभा उमेदवारी अर्ज प्रारंभक पूजन केले तसेच सर्वधर्मसमभावासाठी जगाच्या शांततेसाठी व लातूर लोकसभा मतदारसंघातील विजयासाठी प्रार्थना केली.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर शहराध्यक्ष राजा मनियार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संतोष सोमवंशी, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल,  माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, अहमदखा पठाण, सर्जेराव मोरे, चांदपाशा इनामदार, आयुब मणियार, सिकंदर पटेल, इमरान सय्यद, युसुफ मुजावर, चांदपाशा मुजावर, ख्वॉजा मुजावर, समीयोद्दीन मुजावर,  शफीयोदिन मुजावर, शकील इनामदार, बक्षीभाई शेख, अखिल शेख, गौस शेख, संभाजी सुळ, गोरोबा लोखंडे, युनूस मोमीन, प्रा. प्रवीण कांबळे,   डॉ. सतीश बिराजदार,  डॉ. दीपक गुगळे, डॉ. अशोक पोद्दार,  दगडूआप्पा मिटकरी, सुपर्ण जगताप, चंद्रकांत धायगुडे, विष्णुदास धायगुडे, एकनाथ पाटील, रमेश सूर्यवंशी, पवन सोलंकर, प्रमोद जोशी, अकबर माडजे, युनूस शेख,  युसूफ बाटलीवाला, नजीर शेख, आदिल इनामदार, अखिल शेख, खाजापाशा शेख,  अजीज  बागवान, ख्वॉजामीया शेख, यशपाल कांबळे, जय ढगे आदींसह काँग्रेसचे व महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी पूढे बोलतांना म्हणाले की,  देशात लोकसभा निवडणुका होत आहेत. यावेळी मतदान करतांना विचार करायला हवा.  काँग्रेस नेहमी सर्वांना सोबत घेऊन पूढे जाण्याचा विचार मांडला, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे काम केले. देशाला इमानदार लोकांची गरज आहे, तरच देश योग्य रस्त्यावर  चालतो. यासाठी आम्ही लोकांना देशात बदल घडवण्याचे आवाहन करीत आहोत असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, माणुसकीचं नाव डॉक्टर आहे ३६५ दिवस २४ तास जनतेसाठी ते उपलब्ध असतील २५ वर्षात त्यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल एकही तक्रार आली नाही. सर्वांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचे नाव व हाताचे चिन्ह घराघरात पोचवावे. लोकनेते विलासराव देशमुख व मला जेवढ मताधिक्य दिले, त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य डॉ. शिवाजी काळगे यांना द्यावे, असे ते म्हणाले.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, सर्वांनी यापूर्वीही आम्हाला आशीर्वाद दिले आहेत, यापुढेही आशीर्वाद द्यावे, असे सांगून त्यांनी सर्वांच्या पांिठबाबद्दल आभार मानले. यावेळी विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल यांनी मनोगत व्यक्त्त केले तर शेवटी आभार माजी नगरसेवक अहेमदखॉ पठाण यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR