22.2 C
Latur
Thursday, July 25, 2024
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली भेट

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली भेट

लातूर : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या ८ पैकी ७ जागेवर  मतदारांनी बहुमतांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिले असून त्यात धाराशिव लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे  नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गुरुवारी आशियाना बंगल्यावर राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी  दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली आशिर्वाद घेतला. यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी नूतन खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे आभार व्यक्त्त केले.
याप्रसंगी माजी आमदार दिनकरराव माने, काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, शिवसेनेचे जिल्हा  समन्वयक पप्पू कुलकर्णी,  शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंतराव  देशमुख, शिवसेनेचे महानगर प्रमुख विष्णू साठे, नामदेव चाळक, युवा सेनेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल मातोळकर, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, संचालक अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, पिंटू माने युवती सेनेच्या अध्यक्ष श्रद्धा जवळगेकर, सुनिता चाळक, सचिन दाताळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR