39.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रमुंडेंच्या अडचणी वाढणार?

मुंडेंच्या अडचणी वाढणार?

निलंबित पोलिस निरीक्षक कासलेचा गंभीर आरोप
बीड : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात गेल्या ४ महिन्यांपासून बीड जिल्हा केंद्रस्थानी आहे. अगोदर विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार धनजंय मुडेंच्या निकटवर्तीयांकडून झालेल्या गुंडगिरीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गंभीर आरोप केले होते. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात तीव्र संतापाची लाट उसळल्यानंतर धनजंय मुडेंना मंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. आता बीडमधील निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांनी धनंजय मुडेंवर गंभीर आरोप केले. तसेच त्यांच्या माणसांकडून माझ्या बँक खात्यावर १० लाख रुपये टाकल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून मुंडेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

कारण परळी मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले. तसेच एकट्या रणजीत कासलेला १० लाख दिले असतील तर बाकीच्यांना किती दिले, असा सवाल देशमुख यांनी विचारला आहे. रणजीत कासले यांना धनंजय मुंडे यांनी ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी दहा लाख रुपये दिल्याचे कासले यांनी म्हटले होते. त्यावर परळी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी परळी मतदारसंघात कशा पद्धतीने प्रशासनाचा गैरवापर झाला, याची स्पष्टता दिली.

एकट्या कासलेला १० लाख रुपये दिले तर इतरांना किती रुपये वाटले, असतील असा सवाल करत परळी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाचा कशा रितीने गैरवापर झाला हे समोर आल्याचे राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले. आता या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयात जाणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

देशमुख कोर्टात जाणार
परळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनिमित्त धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. मात्र, या निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. आता कासले यांच्या आरोपानंतर देशमुख पुढे आले असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी ते न्यायालयात धाव घेणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR