23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान

मुंबईत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई शहरात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवर मतदान सरासरी ६७.७७ टक्के झाले होते, तर राज्य स्तरावर सरासरी मतदान ६१ टक्के इतके झाले आहे. लोकशाहीच्या या सर्वांत मोठ्या उत्सवात मतदारराजा मतदान केंद्रावर कशा पद्धतीने येईल यासाठी काही दिवसांपासून विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासोबतच शहरातील मतदार निवडणुकीत मतदान करण्याकरिता का येत नाही? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे कामसुद्धा सुरू करण्यात आले आहे.

यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, म्हणून मुंबई शहर जिल्हाधिका-यांनी दंड थोपटले आहेत. मुंबई शहरात एकूण २४ लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. या ठिकाणी चांगल्यापैकी मतदार हा मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू वस्तीतील आहे. त्याचप्रमाणे शहरात मध्यमवर्गीय आणि गरीब स्तरातील मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत.
या शहरात १० विधानसभांचा समावेश आहे. त्यापैकी सहा विधानसभांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान होते.

५० टक्के अधिक मतदान-
सर्वांत कमी मतदान होणा-या विधानसभांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर कुलाबा मतदारसंघ आहे, तर त्या खालोखाल मुंबादेवी, धारावी, भायखळा, वरळी आणि शिवडी हे मतदारसंघ आहेत, तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करणा-या मतदारसंघांत प्रथम क्रमांकावर वडाळा, त्याखालोखाल माहीम, मलबार हिल आणि सायन कोळीवाडा या मतदारसंघांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR