29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी पंतप्रधान झाले की मी पुन्हा मंत्री होणार

मोदी पंतप्रधान झाले की मी पुन्हा मंत्री होणार

छ. संभाजीनगर : नरेंद्र मोदी अनेकदा मुंबईत आले आहेत. भारत सरकारच्या वतीने हजारो कोटींची मदत मुंबई आणि महाराष्ट्राला दिली आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत नक्कीच नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, की मी मंत्री होणार हे सत्य आहे, निश्चित आहे, असा मोठा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मंत्री होण्याबाबत दावा केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतून कमीत कमी दोन जागा मिळाव्यात, यासाठी रामदास आठवले आग्रही आहेत. अवघ्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. जागावाटप आणि उमेदवारी यांवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यातच रामदास आठवले यांनी मंत्रिपदाबाबत सदर दावा केला आहे.

संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आपण सगळे आहोत
नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाला ‘संविधान सदन’ हे नाव दिले आहे. २६ नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून देशभर पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे असे नरेंद्र मोदी संविधान बदलणे शक्य नाही. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आपण सगळे आहोतच, असे रामदास आठवले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR