29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रमोहिते पाटील तुतारी फुंकणार?

मोहिते पाटील तुतारी फुंकणार?

माढ्यात भाजपला धक्का? धैर्यशील मोहितेंना मिळू शकते उमेदवारी
मुंबई : प्रतिनिधी
अकलूजचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची शरद पवार यांच्यासोबत लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीनंतर धैर्यशील मोहिते पाटलांना प्रवेश देवून त्यांची माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्ह घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्यास पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार आहेत. बाकी सर्व मोहिते पाटील परिवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार गट राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी सकाळी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यात जाऊन मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची पुण्यात शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाच्या लग्न समारंभावेळी भेट झाली. त्यामुळे मोहिते पाटील तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास निंबाळकरविरुद्ध मोहिते पाटील लढत रंगण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR