यंदा बनावट कागदपत्रांचा धोका टळणार ;नोंदणीवेळी होणार कागदपत्रे ऑनलाईन अपलोड

मुंबई : प्रतिनिधी
वैद्यकीय ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’ या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी करणा-या विद्यार्थ्यांना यंदा नोंदणीवेळीच आपली कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे या एका नियमामुळे बनावट उमेदवारांचा धोका जवळपास संपूर्णपणे टळणार असल्याची खात्री राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने व्यक्त केली.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत यंदापासून मोठा बदल करण्यात आला आहे. या कागदपत्रांची पडताळणीही सॉफ्टवेअरद्वारे होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे दाखल केल्यास ती नोंदणी प्रक्रियेतच पकडली जातील.

गेल्या वर्षी राज्यात एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेदरम्यान ऑक्टोबर २०२५ मध्ये परराज्यातील १५१ ते १५२ विद्यार्थ्यांनी बनावट ई-मेल आणि कागदपत्रांचा वापर करून अर्ज केल्याचे उघडकीस आले. सीईटी कक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयित विद्यार्थ्यांवर कारवाई करत त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बडतर्फ केले होते.

अनेकदा एखाद्या विद्यार्थ्याला एखादे महाविद्यालय अलॉट झाल्यावर तो तिथे प्रवेश घ्यायला गेल्यावर त्याच्याकडे काही कागदपत्रे नसल्याचे कारण देत प्रवेश नाकारत होते. एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश नाकारून त्या जागी दुस-या विद्यार्थ्याची वर्णी लावल्याच्या तक्रारीही सीईटी कक्षाकडे आल्या होत्या.
पण आता सर्व कागदपत्रे आधीच ऑनलाईन अपलोड झाली असतील, तर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून या कारणामुळे प्रवेश नाकारण्याचे प्रकार घडणारच नाही, असा विश्वासही सीईटी सेलकडून व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी पहिल्या फेरीत मुंबईतील जीएस मेडिकल कॉलेज (केईएम)मध्ये खुल्या प्रवर्गाचा शेवटचा प्रवेश ५८७ गुणांवर झाला होता. टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज (सायन)मध्ये ५६७, बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथे ५५९, ग्रँट मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल मेडिकल कॉलेज, मुंबई येथे प्रत्येकी ५५६, एचबीटी अँड कूपर मेडिकल कॉलेजमध्ये ५५५, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे ५५१, राजीव गांधी मेडिकल कॉलेज, कलवा येथे ५५०, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे ५३७, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे ५३१ गुणांवर प्रवेश बंद झाला होता.
बीडीएस अभ्यासक्रमासाठी मुंबईच्या शासकीय दंत महाविद्यालयात खुल्या प्रवर्गाचा शेवटचा प्रवेश ४८२ गुणांवर, नायर दंत महाविद्यालयात ४७४, छत्रपती संभाजीनगर येथे ४६७, नागपूर येथे ४६५ आणि जळगाव येथे ४५४ गुणांवर झाला होता. त्यामुळे यंदाही सरकारी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांतील प्रवेशासाठी यावर्षी मोठी स्पर्धा राहणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news