29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeलातूरयेरोळ येथे स्वयंपाक घरात आढळला विषारी कोब्रा 

येरोळ येथे स्वयंपाक घरात आढळला विषारी कोब्रा 

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील येरोळ येथील एका घरात भक्ष्याच्या मागोमाग विषारी कोब्रा नाग शिरला होता. त्यानंतर कोब्रा नागाने भक्ष्याची शिकार करून त्याला फस्त केल्याने तो स्वयंपाकघरामध्ये सुस्त पडला मात्र कोब्रा नागाला पाहून त्या घरातील कुटुंबाची झोपच उडाली होती. अखेर सर्प मित्रिने कोब्रा नागाला पकडल्याने तांबोळकर कुटूंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
      गेल्या पाच सहा दिवसापासुन वातावरणात बदल झाल्याने साप आपल्या बिळातून विषारी बिन विषारी साप भक्ष शोधण्यासाठी मानवी वस्तीच्या ठिकाणी धाव घेत आहेत. अशी एक घटना येरोळ येथील एका घरात घडली तालुक्यातील येरोळ येथील महिला शोभाताई ओमप्रकाश तांबोळकर या सायंकाळचा स्वयंपाक करण्यासाठी घरात गेल्या असता भला मोठा कोब्रा नाग हा उंदीर गिळंकृत करुन सुस्त पडला असल्याचे त्यांना दिसले.  या नागाला पाहुन घरातील मंडळी घाबरली होती.त्यातच साप निघाल्याची माहिती सुमठाणा येथील सर्पमित्र तरुण सुदर्शन लांडगे यांना फोनवर देताच त्यांनी या सापाला पकडुन वनविभागामार्फत वनामध्ये सोडुन दिले. घरात कुठेही साप निघाल्यास सर्पमिञ सुदर्शन लांडगे यांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR