नाशिक : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौ-यावर आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरगाणा येथे ७३६ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांच्या कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम पार पडला. आदिवासी बांधवांकडून पारंपरिक पद्धतीने आदिवासी नृत्य सादर करत अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना गिफ्ट दिले आहे.
यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत औपचारिकरीत्या पाच महिलांचा सन्मान अजितदादांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.