39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्ररश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद

रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद

रामटेकमध्ये कॉंग्रेसला धक्का, पती श्याम बर्वे मैदानात
नागपूर : प्रतिनिधी
रामटेकवरून महाविकास आघाडीत दावे-प्रतिदावे सुरू होते. शिवसेना ठाकरे गटाची ती जागा असल्याने ते सोडायला तयार नव्हते. परंतु कॉंग्रेसने ही जागा प्रतिष्ठेची करून घेतली आणि तेथे रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. गुरुवारी सकाळी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळी अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे कॉंग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, रश्मी बर्वेंचे पती श्याम बर्वे यांनी डमी अर्ज भरला होता. त्यांचा अर्ज वैध ठरल्याने आता ते मैदानात असणार आहेत.

आज पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज छाननीचा दिवस होता. तत्पूर्वीच आज सकाळी जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले. त्यामुळे उमेदवारी अर्जाच्या छाननीत रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, कॉंग्रेस नेत्यांची धाकधूक वाढली होती. त्यातच निवडणूक निर्णय अधिका-यांनी सायंकाळी जात प्रमाणपत्र वैध नसल्याचे कारण देत रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला. त्यामुळे कॉंग्रेसला फार मोठा धक्का बसला आहे. बर्वे यांनी दोन दिवसांपूर्वीच मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर महायुतीसह अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला. रश्मी बर्वे यांनी जातवैधता प्रमाणपत्र तयार करताना खोटी कागदपत्रे जोडली, त्यामुळे त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र कसे खोटे आहे हे महायुतीच्या नेत्यांनी वकिलामार्फत निवडणूक निर्णय अधिका-यांना पटवून दिले. त्यामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज टिकतो की बाद होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला.

या अगोदर रामटेकमधून किशोर गजभियेंनी कॉंग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. प्रशासकीय अधिकारी असल्याने त्यांनी अगोदरच रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र बाद ठरणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, मात्र, कॉंग्रेस नेत्यांनी त्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे किशोर गजभिये नाराज होते. आता त्यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे

रश्मी बर्वेंच्या पतीचा
श्याम बर्वे यांचा अर्ज वैध
रश्मी बर्वे यांचे पती श्याम बर्वेंचा उमेदवारी अर्ज ग्रा धरण्यात आल्यामुळे आता तेच काँग्रेसचे उमेदवार राहण्याची राहणार आहेत. त्यामुळे तेवढा तरी दिलासा मिळाला आहे अन्यथा दुस-या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ पक्षावर आली असती. आता या मतदारसंघात शिंदे गटाचे राजू पारवे, कॉंग्रेसचे श्याम बर्वे आणि वंचितचे किशोर गजभिये अशी लढत रंगणार आहे.

दुर्गेचा अवतार घेऊन निदस्त करेन
मी अबला नाही, सबला आहे. दुर्गेच्या अवतार म्हणून एक नारी जेव्हा आपले रूप घेते, तेव्हा भस्मासुर, महिषासुरसारख्या राक्षसाला निदस्त करते. हे तर सरकार आहे, यांचे दिवस जास्त नाहीत. यांच्या विरोधामध्ये उभा राहतो त्यांच्यामागे कटकारस्थान करतात. ही सरकारची हुकूमशाही आहे. पण हे फार काळ चालणार नाही, असे रश्मी बर्वे म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR