38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रराजस्थान रॉयल्सचा विजय

राजस्थान रॉयल्सचा विजय

 

नवी दिल्ली : आयपीएल २०२४ च्या ९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने १८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ केवळ १७३ धावा करू शकला. राजस्थानच्या विजयाचे नायक होते, रियान पराग आणि आवेश खान. रियान परागने नाबाद ८४ धावा केल्या. राजस्थानला १७ धावांची गरज असलेल्या सामन्यातील शेवटचे षटक आवेश खानने टाकले. पण या गोलंदाजाने २० व्या षटकात केवळ ४ धावा दिल्या. चहलने १९ धावांत २ बळी घेतले आणि बर्गरने २९ धावांत २ बळी घेतले.

राजस्थान रॉयल्सने या मोसमात सलग दुसरा विजय नोंदवला तर दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा दुसरा सामना गमावला. या विजयासह राजस्थानचा संघ गुणतालिकेत दुस-या स्थानावर आहे. चेन्नईप्रमाणेच या संघानेही दोन्ही सामने जिंकले आहेत. पण निव्वळ धावगतीच्या आधारावर राजस्थान दुस-या स्थानावर आहे. १८६ धावांचे आव्हान होते पण दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मिचेल मार्शने विशेषत: पॉवरप्लेमध्ये ५ चौकार मारून आपले कौशल्य दाखवले, परंतु त्यानंतर नांद्रे बर्जरने या फलंदाजाला २३ धावांवर बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले.

यानंतर बर्गरने त्याच षटकात रिकी भुईला ० धावांवर बाद केले. दोन विकेट पडल्यानंतर पंत आणि वॉर्नरने संघावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. वॉर्नरने आक्रमक पवित्रा घेत ३४ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकार लगावले. पण या खेळाडूने ४९ च्या वैयक्तिक धावसंख्येवर आपली विकेट गमावली आणि इथून दिल्लीचा संघ डळमळीत झाला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत त्याच्या कामगिरीने निराश झाला. या डावखु-या खेळाडूला २६ चेंडूत केवळ २८ धावा करता आल्या आणि त्याला यजुवेंद्र चहलने शिकार केले. आऊट झाल्यानंतर पंत अस्वस्थ झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने आपली बॅट भिंतीवर आदळली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR