29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeपरभणीराज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेसाठी ओंकार साबळेची निवड

राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेसाठी ओंकार साबळेची निवड

परभणी : फ्रान्स लिऑन येथे होणा-या जागतिक कौशल्य स्पर्धे करिता महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी यांच्यावतीने जिल्हा, विभाग, राज्य स्तरावर स्पर्धा घेण्यात येत आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेंटर ट्रेडचा प्रशिक्षणार्थी ओंकार साबळे याची मुंबई येथे होणा-या राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश घेतल्यानंतर ओंकार साबळे याने यापूर्वी विविध स्पर्धेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मतदान जनजागृती तहसील कार्यालय सहभागी होऊन यश संपादन केले आहे.

याचबरोबर आपल्या कलेची वेगळी चुणूक दाखवून राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र झाला आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होत असतात. राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद व महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी यांच्या वतीने विविध स्तरावर स्पर्धा घेण्यात येतात. ६१ कौशल्य प्रकारात या स्पर्धा घेतल्या जातात. तांत्रिक महाविद्यालय, इंजीनियरिंग कॉलेज, आयटीआय प्रशिक्षणार्थी या स्पर्धेत सहभागी होत असतात. आयटीआय पेंटर ट्रेडचा प्रशिक्षणार्थी ओंकार साबळे याने पेंटिंग अँड डेकोरेटिंग या प्रकारात सहभागी होऊन रंग व रंगछटा या बाबीच्या आधारावर आपली एक वेगळी चुणूक दाखवून राज्यस्तरावर निवड झाली आहे. यास पेंटर विभागाचे सतीश छापरवाल व प्रकाश बानाटे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR