34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeराष्ट्रीय‘कमळ’ चिन्ह गोठविण्याची मागणी; हायकोर्टाने फेटाळली ‘ती’ याचिका

‘कमळ’ चिन्ह गोठविण्याची मागणी; हायकोर्टाने फेटाळली ‘ती’ याचिका

मद्रास : भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह कमळ काढून घेण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर, बुधवार, २० मार्च २०२४ रोजी सुनावणी घेत मद्रास उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

उच्च न्यायालयाने भाजपचे निवडणूक चिन्ह गोठवावे असे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, असे याचिकेत म्हटले होते.

मुख्य न्यायाधीश एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती डी. भरत चक्रवर्ती यांचा समावेश असलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तामिळनाडूच्या अहिंसा सोशॅलिस्ट पार्टीचे संस्थापक टी. रमेश यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

टी. रमेश यांनी दाखल यांनी दाखल केलेल्या याचिकेत ८ डिसेंबर २०२३ रोजी त्यांनी असा युक्तिवाद केला होता की, कमळ हे केवळ धार्मिकच नाही तर राष्ट्रीय चिन्ह देखील आहे. त्यामुळे ते भाजपला देऊन भारतीय निवडणूक आयोगाने स्वत:च्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

मुख्य न्यायाधीशांनी रमेश यांना विचारले की, भाजपला दिलेल्या या चिन्हाचा तुम्हाला कसा त्रास होत आहे? यावर रमेश म्हणाले की, इतर पक्षांशी भेदभाव केला जात आहे आणि त्यांच्यावर अन्याय होत आहे.

वकील एम.एल. रवी यांच्यामार्फत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात याचिकाकर्ते रमेश यांनी भाजप हा नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष असल्याचे म्हटले होते. त्यांना निवडणूक चिन्ह म्हणून कमळ देताना निवडणूक आयोगाने, कमळ हे राष्ट्रीय फूल आहे आणि कर्नाटक आणि हरियाणाचे राज्य फूल आहे याचा विचार केला नाही.

याचिकाकर्त्याने पुढे म्हटले आहे की, प्राचीन पौराणिक कथांमध्ये कमळाचा उल्लेख असल्याने त्याला शुभ आणि पवित्र मानले जाते. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मात कमळाचे फूल महत्त्वाचे मानले जाते.

हिंदू देवता शिव, विष्णू, ब्रह्मा, गणेश, दुर्गा, काली, लक्ष्मी आणि सरस्वती यांना कमळावर बसलेले दाखवले आहे. हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान विष्णूचे वर्णन पुंडरीकाक्ष म्हणून केले जाते ज्याचा अर्थ ‘कमळाचे डोळे’ आहे. त्यामुळे राजकिय पक्षाने याचा वापर करणे अयोग्य आहे, असा दावा याचिकाकर्ते रमेश यांनी आपल्या याचिकेत केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR